🕒 1 min read
बीड : परळी वैद्यनाथ (Parli Vaidhyanath Temple) ज्योतिर्लिंग मंदिराच्या नवीन दर्शन मंडपात काही कामगारांनी रात्रीच्या वेळेस चूल मांडून आमलेट व मांस शिजवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मंदिर परिसरात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भाजप पदाधिकारी योगेश पांडकर यांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविला.
या प्रकाराची माहिती मिळताच, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य राजेश देशमुख यांनी नगरपरिषदेकडे नियंत्रण असल्याचे सांगितले. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या कामात संबंधित कामगार हे नगरपरिषदेअंतर्गत काम करत होते.
Mutton cooked in the new darshan pavilion of Parli Vaidyanath Temple
या प्रकारानंतर तातडीने संबंधित कामगारांना कामावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर मंदिर परिसरातील दर्शन मंडपाजवळील जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- Nashik Kumbh Mela : या दिवशी पहिले ‘शाही स्नान’; 31 ऑक्टोबरपासून कुंभमेळा पर्वाला होणार सुरुवात
- अखेर आनंदाचा दिवस आला! ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? पण…..
- एकाच झटक्यात राष्ट्रवादी फुटली! 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now






