Share

एकाच झटक्यात राष्ट्रवादी फुटली! 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ

Big jolt to NCP in Nagaland as 7 MLAs join NDPP. Speaker okays merger, Rio’s govt stronger with 32 seats in the 60-member assembly. Ajit Pawar’s party faces a major setback

Published On: 

Historic decision of Rs 681 crore for the development of Ahilyadevi memorial site, approval from Ajit Pawar planning department

🕒 1 min read

कोहिमा | विशेष प्रतिनिधी: नागालँडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे सात आमदार एकाच वेळी बाहेर पडत त्यांनी थेट सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) ची वाट धरली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नागालँडमधील विरोधी पक्ष म्हणून असलेला मजबूत दबदबा तुटला आहे. राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले असून मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांचे सरकार आणखी मजबूत झाले आहे.

Ajit Pawar’s party faces a major setback

स्पीकरकडून अधिकृत मान्यता

विधानसभेच्या अध्यक्षांनी सातही आमदारांच्या NDPP मध्ये विलीनीकरणास मान्यता दिली आहे. हे विलीनीकरण 10 व्या अनुसूचीनुसार वैध ठरवले गेले आहे. यामध्ये नामरी नचांग, के. ए. पोंगशी फोम, पिक्टो शोहे, वाई म्होनबेमो हम्त्सो, वाई मनखाओ कोन्याक, के. एस. तोइहो येप्थो यांचा समावेश आहे.

2023 मध्ये मोठं यश, पण…

2023 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये 12 जागा जिंकून तिसरा मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं होतं. पण या आमदारांच्या अचानक पलटीनंतर, पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

NDPP ची संख्या 32 वर

या घडामोडीनंतर NDPP ची संख्या 25 वरून 32 वर गेली आहे. 60 सदस्यीय विधानसभेत बहुमत अधिक पक्कं झाल्यामुळे आता सत्ताधारी पक्षाला कोणताही धोका उरलेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA