🕒 1 min read
मुंबई : ‘कबीर सिंग’ आणि ‘ॲनिमल’सारख्या वादग्रस्त पण यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या आगामी ‘स्पिरीट’ या चित्रपटातून दीपिका पादुकोणने माघार घेतल्यानंतर संदीपने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीचं नाव न घेता त्याने ‘डर्टी पीआर गेम्स’ म्हणत ताशेरे ओढले आहेत.
दीपिकाच्या माघारीमुळे संदीप संतप्त:
एक्स (ट्विटर) वर लिहिलेल्या पोस्टमध्ये संदीप म्हणतो, “जेव्हा मी एखाद्या कलाकाराला स्क्रिप्ट सांगतो, तेव्हा तो गोपनीय करार समजून ऐकतो. पण ज्याने कथा इतरांना सांगून माझ्या मेहनतीचा अपमान केला, त्या व्यक्तीने आपला खरा चेहरा दाखवला आहे. माझ्या दृष्टिकोनातून, तू कधीही एक खरी कलाकार होऊ शकणार नाहीस.” या पोस्टमध्ये त्याने अप्रत्यक्षपणे दीपिकावर टीका करत ‘घाणेरडं पीआर’ खेळल्याचा आरोप केला आहे.
Deepika leaked the script after leaving ‘Spirit’? Sandeep Reddy Vanga is furious
स्पिरीटमध्ये तृप्ती डिमरीची एन्ट्री:
दीपिकाच्या एक्झिटनंतर ‘ॲनिमल’मधून लक्षात आलेली तृप्ती डिमरी आता प्रभासच्या जोडीने ‘स्पिरीट’मध्ये झळकणार आहे. याच दिवशी दीपिकाच्या बाहेर पडल्याच्या बातम्या समोर आल्या आणि तृप्तीच्या सहभागाची घोषणा झाली, हे विशेष लक्षवेधी ठरलं.
वादाचा मूळ मुद्दा काय?
चित्रपटाच्या बोल्ड कंटेंट, लांब शूटिंग शेड्युल आणि कमी कामाचे तास, तसेच तेलुगू संवादांबाबत असलेला संकोच, हे दीपिकाच्या माघारीचे कारण असल्याचं म्हटलं जात आहे. संदीपने त्याच पोस्टमध्ये म्हटलं की, “मला फरक पडत नाही, पुढच्या वेळेस संपूर्ण स्क्रिप्टच जाहीर करून टाक.” संदीपचा रोष आणि पोस्टमधील भाषेवरून ती पोस्ट दीपिकासाठीच होती असा अंदाज सोशल मीडियावर लावला जात आहे. दीपिकाकडून या पोस्टवर अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025 Final: आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात अंतिम लढत होईल
- “तुमच्याकडे सगळं आहे, पण काय नाही ते माहीत नाही!”; नाना पाटेकरांचं अमिताभ बच्चन यांना उत्तर
- थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसण्याआधीच ड्रायव्हरनं कार चालू केली अन्…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





