🕒 1 min read
मुंबई : ‘मेट्रो… इन दिनों’ या आगामी चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. या चित्रपटात त्या अनुपम खेरसोबत झळकणार आहेत. दोघांचाही एकत्र अभिनय अनुभव प्रेक्षकांना पहायला मिळणार असून, यामधील रोमँटिक आणि भावनिक सीन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
नीना गुप्तांनी अनुपम खेरसोबतच्या सहकार्याचा अनुभव मोकळेपणाने शेअर केला. “आमचं नातं गिव्ह अँड टेकचं आहे. थिएटरपासून आमची ओळख आहे आणि त्यामुळे काम करताना एकमेकांना समजून घेणं सोपं जातं,” असं त्या म्हणाल्या.
Relationship with Anupam Kher is one of ‘give and take’ – Neena Gupta
चित्रपटातील काही भावनिक दृश्यांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “अनुपम नेहमीच काहीतरी नवीन, परिणामकारक कल्पना देत असे. त्या सूचनांमुळे दृश्यं अधिक खऱ्यासारखी वाटायची. मला त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली.”
डबिंग करताना नीना यांना स्वतःच्या भूमिकेचं महत्त्व जाणवलं. “शूटिंगच्या वेळी लक्षात आलं नाही, पण डबिंग करताना जाणवलं की मी खूप काही दिलं आहे या भूमिकेला,” असं त्या म्हणाल्या.
📌 महत्वाच्या बातम्या
- “लाडक्या बहिणींमुळे राज्य बुडालं!” शिंदे गटाचाच आमदार सरकारवर तुटून पडला
- “ठाकरे बंधू एकत्र येऊ देत, भाजप घाबरत नाही!”; पंकजा मुंडेंचं उत्तर
- जितेंद्र यांनी 83 व्या वर्षी एका रात्रीत कमावले 855 कोटी! नक्की काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now






