Share

“लाडक्या बहिणींमुळे राज्य बुडालं!” शिंदे गटाचाच आमदार सरकारवर तुटून पडला

Sanjay Gaikwad says no MLA received funds, blames Ladki Bahin scheme for Maharashtra’s financial troubles.

Published On: 

"The state sank because of our beloved sisters!" Shinde faction's MLA lashed out at the government

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेवर आता थेट त्यांच्या गटातीलच आमदाराने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Shinde MLA) यांनी ही योजना राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा असल्याचं थेटपणे म्हटलं आहे.

गायकवाड म्हणाले, “लाडकी बहीण योजनेमुळे इतर कोणत्याही योजनेसाठी निधी मिळालेला नाही. एकाही आमदाराला मागील अधिवेशनात जाहीर झालेले बजेटचे पैसे मिळालेले नाहीत.”

“The state sank because of our beloved sisters!”

विरोधकांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर आरोप केल्यानंतर, गायकवाड यांनी त्यावर दुजोरा देताना सांगितलं की, “सध्या राज्य संकटात आहे हे नाकारता येत नाही. योजनेचा परिणाम केवळ विकासकामांवरच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या पगारांवरही झाला आहे.”

ते पुढे म्हणाले, “सव्वा लाख कोटींची तूट अर्थसंकल्पात आहे. मात्र जुलै-ऑगस्टपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे.”

विशेष म्हणजे, हा मुद्दा फक्त शिंदे गटापुरता मर्यादित नसून, सर्वच पक्षांच्या आमदारांना निधी मिळालेला नाही, असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं. “सर्वच आमदार गप्प आहेत. कुणी काही बोलत नाही. ‘लाडक्या बहिणींना सांभाळा’ असं म्हणत सर्व शांत आहेत,” असंही त्यांनी म्हटलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Politics News
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या