Share

“ठाकरे बंधू एकत्र येऊ देत, भाजप घाबरत नाही!”; पंकजा मुंडेंचं उत्तर

Pankaja Munde says BJP remains unaffected by Thackeray brothers’ alliance, calls BJP the world’s largest party.

Published On: 

"Let the Thackeray brothers come together, BJP is not afraid!"; Pankaja Munde's reply

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे युतीच्या चर्चांना राज्याच्या राजकारणात जोर चढला असताना भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ठाकरे बंधू (Thackeray brothers) एकत्र आले तरी भाजपला कुठेही अडचण येणार नाही. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे,” असं ठाम मत पंकजा मुंडेंनी मांडलं.

तुळजापूर दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडेंना पत्रकारांनी विचारलं की ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला अडचण होईल का? यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, “देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आली आहे आणि राज्यातही आमचं सरकार आहे. त्यामुळे ही युती झाल्याने भाजपला अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही.”

“Let the Thackeray brothers come together, BJP is not afraid!”

दरम्यान, मंत्री नितेश राणेंनीही या युतीवर मिश्कील प्रतिक्रिया देत टोले लगावले. “एकाकडे २० आमदार, दुसऱ्याकडे शून्य… आम्हाला घाम फुटला हो! झोप लागत नाही,” अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. शिवाय, “हिंदुत्व सोडल्यामुळे ठाकरे ब्रँड संपला,” असा टोलाही लगावला.

उद्धव ठाकरे मात्र या चर्चांबाबत नेहमीप्रमाणेच संकेतात्मक बोलले. “महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल. आता फक्त संकेत नाही, थेट बातमी देतो,” असं म्हणत त्यांनी युतीबाबत थेट निर्णयाची सूचना दिली.

राज ठाकरेही यावेळी मिश्कील मूडमध्ये दिसले. “मातोश्रीवर जातोय,” असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाला हशा पिकवला. लगेचच त्यांनी खुलासाही केला, “मी बहिणीकडे जातोय.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Politics News
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या