🕒 1 min read
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या साध्या आणि मातीशी नातं जोडणाऱ्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. नुकत्याच एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी घडलेला एक खास संवाद प्रेक्षकांसोबत शेअर केला.
‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, एकदा अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारलं, “तुम्ही हे सगळं सोडून गावी का गेलात?” त्यावर नानांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं – “तुम्हाला समजेल, जर तुम्ही तिथे आलात. तुमच्याकडे सगळं आहे, पण काय नाही तेच कळत नाही. जे आमच्याकडे आहे, तेच खरं संपन्न आहे. इथे निसर्ग आहे, माणसं आहेत, जनावरं आहेत – आणि हेच मला हवं आहे.”
“You have everything, but you don’t know what you don’t have!”; Nana Patekar’s reply to Amitabh Bachchan
नाना पाटेकरांनी आपल्या शेतीच्या आयुष्याची उदाहरणं देत आनंदाच्या वेगळ्या परिमाणांची कल्पना दिली. ते म्हणाले, “मी बोअर घेतली, तीन इंच पाणी लागलं, त्याचा आनंद मला झाला. नवीन गाडी घेतली असती, तेवढा आनंद झाला नसता. मी रस्त्यावर भांडण सुरू असेल, तर गाडीतून उतरून लोकांशी बोलतो. ते मला माझी माणसं वाटतात.”
तसेच त्यांनी एका सहकलाकारासोबतचा अनुभव शेअर करत खादीचे महत्त्व अधोरेखित केले. “तो म्हणाला, तुम्ही साधे कपडे का घालता? मी म्हटलं, हे सर्वांत महाग कपडे आहेत – खादीचे. रोज धुवावे लागतात, तुझ्या जीन्ससारखे नाही!”
📌 महत्वाच्या बातम्या
- थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसण्याआधीच ड्रायव्हरनं कार चालू केली अन्…
- भीमा नदीला पूर; बारामती व दौंडमध्ये शेतीचे नुकसान, पाभे गावाचा संपर्क तुटला
- सलमान खानचा ‘सिकंदर’ आता OTT वर; अखेर प्रतीक्षा संपली!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





