Share

संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप; अंजली दमानियांचा संताप

Siddhant Shirsat, son of Maharashtra Cabinet Minister Sanjay Shirsat, faces serious accusations from a married woman. Anjali Damania demands a press conference and immediate government action.

Published On: 

Serious allegations against Sanjay Shirsat's son; Anjali Damania is furious

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर, सिद्धांत शिरसाट, याच्यावर एका विवाहित महिलेने मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

दमानियांचा संतप्त सवाल:

अंजली दमानिया म्हणाल्या, “ही घटना ऐकून मला धक्का बसला. मुलीने स्पष्टपणे सांगितलंय की, सिद्धांतने आत्महत्येची धमकी दिली, ब्लेडने हात कापून घेण्याची भाषा केली. त्याने असंही सांगितलं की ‘माझे वडील मंत्री आहेत, त्यामुळे तुला घरी नेऊ शकत नाही.’ हे अत्यंत गंभीर आहे.”

Serious allegations against Sanjay Shirsat’s son; Anjali Damania is furious

शिरसाटांनी जाहीर खुलासा करावा – दमानिया:

“संजय शिरसाट यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा. जर ते बोलले नाहीत, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः कारवाई करायला हवी. आम्ही सरकारवर दबाव आणू,” असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकरण नेमकं काय?

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिची ओळख सिद्धांत शिरसाट यांच्याशी सोशल मीडियावर झाली आणि त्यातून संबंध वाढले. चेंबूरमधील फ्लॅटमध्ये भेटीगाठी झाल्या आणि शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत लग्नासाठी दबाव टाकला.

14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने लग्न झाल्याचा दावा महिलेनं केला आहे. मात्र त्यानंतर वागणुकीत बदल झाला. सिद्धांतने जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही तिने केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाण्यास नकार दिला.

कायदेशीर पावले उचलली:

महिलेच्या वकिलांमार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. मानसिक छळ, फसवणूक, धमकी, आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA