Share

“हे काम बाळासाहेबांना नाही जमलं, पण फडणवीसांना जमलं”; राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray and Uddhav reunite on stage after 20 years; Raj slams Hindi policy, praises Fadnavis.

Published On: 

“Balasaheb didn’t succeed, but Fadnavis did”; Raj Thackeray’s taunt

🕒 1 min read

वरळी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. “हे काम बाळासाहेबांना जमलं नाही… पण देवेंद्र फडणवीसांना जमलं,” असा थेट टोलाच राज ठाकरेंनी लगावला. वरळी डोममध्ये शनिवारी पार पडलेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते.

राज आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाचे हे दृश्य लक्षवेधी ठरले. भाषणाची सुरुवात राज ठाकरेंनी “सन्माननीय उद्धव ठाकरे” अशा शब्दांनी केली. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे मराठी जनतेला संबोधत सरकारवर जोरदार टीका केली.

“Balasaheb didn’t succeed, but Fadnavis did”; Raj Thackeray’s taunt

“आज मोर्चा निघायला हवा होता, पण फक्त घोषणेवरूनच हे मागे फिरले. निर्णय घ्यायचा आणि मत मांडायचं अधिकार आपल्याकडे नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील हिंदी सक्ती, त्रिभाषा सूत्र, आणि शिक्षण धोरणांवरही राज ठाकरे संतापले. “हिंदी सक्ती कुणासाठी? दक्षिणेत त्रिभाषा सूत्र नाही. मग महाराष्ट्रात काय प्रयोग?” असं विचारत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

“हिंदी बोलणारी राज्यं मागासलेली आहेत, आणि जी राज्यं हिंदी बोलत नाहीत ती प्रगत आहेत. मग आम्ही हिंदी शिकायचं का? आम्ही मराठा म्हणून कधी आमची भाषा लादली का?” अशा शब्दांत त्यांनी भाषिक अस्मितेचा मुद्दा उचलून धरला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Politics News
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या