🕒 1 min read
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.
Amit Shah in Pune today! Traffic changes, avoid roads
शहा एनडीएमधील कॅडेट्स व लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरला भेट देतील. त्याचबरोबर बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी आणि पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. यासाठी ते येरवड्यातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत काही तात्पुरते बदल करण्यात आलेत. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा खडीमशीन चौक ते कात्रज चौक दरम्यान जड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच बंडगार्डन विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौक या मार्गावरील वाहतूकही आवश्यकतेनुसार वळवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी आणि आवाज कोंबडीसारखा”, ठाकरे गटाचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
- मैत्रिणीच्या मृत्यूला चारच दिवस… आणि रश्मी देसाईचा ‘फोटोशूट’; नेटकऱ्यांचा संताप
- मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील ४८ तास महत्वाचे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





