🕒 1 min read
मुंबई : हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चात ठाकरे बंधू (Raj and Uddhav) एकत्र येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा संयुक्त मोर्चा असणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडूनही या मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “मराठी भाषा, शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा विषय गंभीर आहे. त्यामुळे आमचा पक्ष या मोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे.” मात्र शरद पवार (Sharad Pawar) स्वतः सहभागी होणार का, यावर त्यांनी स्पष्टता न देता, “कदाचित उद्या कळेल”, असं म्हटलं. त्यासोबतच जयंत पाटील यांच्याकडून लवकरच सविस्तर माहिती मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं.
Raj-Uddhav together again, will Sharad Pawar also come along?
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी ट्विट करत अधिकृत पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘महाराष्ट्रहितासाठी आमचा पक्ष नेहमी पुढे असतो. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत व्हावं, ही आमची ठाम भूमिका आहे. सरकार त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी सक्ती लादत असेल, तर आम्ही त्याला विरोध करू.’
NEP 2020 अंतर्गत केंद्र सरकारने त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार, पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. ह्याचा मराठी विद्यार्थ्यांवर परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे. यामुळेच अनेक पालक, शिक्षक, तज्ज्ञ आणि राजकीय पक्ष सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत आहेत.
५ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या या मोर्चाला कलाकार, साहित्यिक, विविध सामाजिक संस्था आणि मराठीप्रेमी जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर शरद पवारही मोर्चात सहभागी होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “काल सत्यनारायणाची पूजा, रात्री अचानक मृत्यू”, शेफाली जरीवालाच्या जाण्याआधी घरात नेमकं काय घडलं?
- “राज ठाकरे यांची अवस्था हसण्यासारखी!”, राज-उद्धव मोर्चावर सदावर्तेंचा हल्लाबोल
- “ठाकरे ब्रँड आहे!” अमित शाहांना टॅग करत राऊतांचा घणाघात; शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








