🕒 1 min read
झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ मालिकेत ताराची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री प्राची पिसाटने (Prachi Pisat) ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यावर फ्लर्टिंगचा आरोप केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. प्राचीने फेसबुक मॅसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत सुदेश यांनी अश्लील मेसेज केल्याचा दावा केला होता.
या आरोपांनंतर जवळपास पाच दिवसांनी सुदेश म्हशीलकर यांनी इंस्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहून मौन सोडलं आणि आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी यासंदर्भातील पोलीस तक्रारीची प्रतही जोडली.
Sudesh Mhashilkar finally breaks his silence on the flirting allegations
त्यांनी म्हटलंय की, “तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण मी पाठवला की कुणीतरी गैरवापर केला हे निश्चित नाही. यासंदर्भात मी पोलीस तक्रार दिली आहे.” तसेच प्राचीचा नंबर आधीपासून सेव्ह असल्यामुळे फेसबुकवरून मागण्याची गरज नव्हती असंही ते म्हणाले.
म्हशीलकर यांनी स्पष्ट केलं की, “मी कोणालाही धमकावलं नाही. माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कुणी काळजीपोटी प्राचीशी संपर्क केला असेल तर मला माहित नाही.” त्यांनी पुढे सांगितलं की त्यांची पत्नी कॅन्सरग्रस्त असून, या प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात आहे.
दरम्यान, प्राचीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये’ आणि ‘खूपच सेक्सी दिसतेयस’ असे मेसेज असल्याचा दावा केला आहे. सुदेश यांच्याकडून जाहीर माफीची मागणीही प्राचीने केली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- Extramarital affair : नेपाळमध्ये पत्नी दीरासोबत रंगेहाथ पकडली; 9 वर्षांचा फसवणुकीचा खेळ संपला
- IPL 2025: निकोलस पूरनचा टॉप 10 खेळाडूंमध्ये समावेश, लिस्टमध्ये मिळाली जागा
- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : पती शशांक, सासू व नणंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





