Share

Extramarital affair : नेपाळमध्ये पत्नी दीरासोबत रंगेहाथ पकडली; 9 वर्षांचा फसवणुकीचा खेळ संपला

A shocking case of extramarital affair from Bihar: Woman caught with brother-in-law in hotel after 9 years of cheating husband. FIR filed, police investigating.

Published On: 

Extramarital affair: Caught red-handed with wife Deera in Nepal; 9-year cheating game ends

🕒 1 min read

बिहारमधील अररिया जिल्ह्यातून एक धक्कादायक विवाहबाह्य संबंध प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहित महिलेचं आपल्या पतीऐवजी मोठ्या दीरासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचं उघड झालं आहे. गेल्या 9 वर्षांपासून ती आपल्या नवऱ्याला फसवत होती आणि वेळोवेळी दीरासोबत नेपाळमध्ये (Nepal) फिरायला जायची. मात्र, यावेळी नशीब तिच्या बाजूने नव्हतं.

Extramarital affair: Caught red-handed with wife Deera in Nepal; 9-year cheating game ends

पीडित पतीला माहिती मिळाली की, त्याची पत्नी आणि मोठा भाऊ नेपाळमधील एका हॉटेलमध्ये एकत्र आहेत. तो तातडीने पोहोचला आणि दोघांना आपत्तिजनक अवस्थेत पकडलं. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्येच गोंधळ घातला आणि परत आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने पत्नीवर आणि भावावर अनैतिक संबंध आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले.

या प्रकरणात संबंधित पतीने काही वर्षांपूर्वीही पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावेळी उलट पत्नीनेच पतीविरोधात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दोघांकडून एक जबाबनामा लिहून घेतला गेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News
MAHASATTA