🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा त्याच्या भन्नाट विनोदबुद्धीमुळे चर्चेत आला आहे. ‘हाऊसफुल 5’ या बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात पत्रकाराने अक्षयला थेट विचारलं की त्याने या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं? यावर अक्षयनं दिलेलं उत्तर ऐकून उपस्थित सर्वजण हसून लोटपोट झाले.
अक्षयनं उत्तर दिलं – “मी पैसे घेतले, खूप पैसे घेतले. पण मी तुला का सांगू? तू काय माझा भाचा आहेस का? तुला रेड टाकायची आहे का? चित्रपट चांगल्या बजेटमध्ये बनवला आहे आणि मजाही आली,” असं म्हणत अक्षयनं मजेशीर पद्धतीने प्रश्न चुकवला.
‘Why should I tell you? Are you my nephew?’, Akshay gets angry when asked about Housefull 5’s remuneration
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, युजर्स अक्षयच्या युक्तिवादाचं कौतुक करत आहेत. काहींनी त्याला “सेवेज रिप्लाय” म्हटलं आहे तर काहींनी “खिलाडीशी पंगा नको” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘हाऊसफुल 5’ या चित्रपटात अक्षयसोबत अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, चित्रांगदा सिंह आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून रोजी प्रदर्शित होणार असून तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि साजिद नाडियाडवाला निर्मिती करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “फॉर्च्युनर नाही दिली तर गाडी पेटवीन”, शशांकवर वैष्णवीच्या वडिलांचा गंभीर आरोप
- लाडकींच्या हप्त्यासाठी आदिवासी विकास खात्याच्या निधीवर डल्ला! मंत्री अशोक उईके म्हणाले…
- पद्मश्री अशोक सराफांसाठी पायलट भाचीची सरप्राइज अनाउन्समेंट; विमानात टाळ्यांचा कडकडाट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





