Share

“जास्त नाटकं झाली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे!” – राज ठाकरे

Raj Thackeray reacts to Marathi language clash, warns MNS workers: “Don’t attack randomly, act only if provoked.”

Published On: 

"If there is too much drama, we must raise our voices!" – Raj Thackeray

🕒 1 min read

मुंबई : वरळी डोमवर शनिवारी पार पडलेल्या मनसे-शिवसेना विजयी मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना थेट इशारा दिला. “मराठीचा आग्रह जरूर ठेवा, पण अति केलं तर कानाखाली आवाज काढावा लागेल,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मीरा-भाईंदरमध्ये अमराठी दुकानदाराला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

“If there is too much drama, we must raise our voices!”

“काल एका व्यापाऱ्याला मारलं, पण त्याच्या कपाळावर गुजराती असं लिहिलं होतं का? बाचाबाचीत तो गुजराती निघाला. मग ते काही चॅनल्सनं ‘गुजरातीला मारलं’ असं चालवलं. अजून आम्ही काहीच केलं नाही,” असं सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, “मराठी हवीच, पण उठसूट मारामारी नको. अति नाटकं झाली तरच कानाखाली द्यायला हवं – पण चूक समोरच्याची असली पाहिजे.” त्यांनी व्हिडिओ काढण्यावरही नाराजी व्यक्त करत, “अशा प्रसंगांचे व्हिडिओ काढू नका. आपल्याच माणसांत हे समजावून सांगा. मारणारा सांगत नाही, मार खाल्लेला सांगतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “माझा एक मित्र नयन शाह, मी त्याला गुजराती म्हणतो, पण अप्रतिम मराठीत बोलतो. शिवाजी पार्कात पुलंचं साहित्य ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं बाळकडू असं असावं.”

बातमीचा शेवट करताना त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला – “सावध रहा, सतर्क रहा. पुढे काय घडेल माहीत नाही, पण मराठीसाठीची एकजूट कायम राहिली पाहिजे. बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं, हीच अपेक्षा.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA

🕘 संबंधित बातम्या