Share

पित्त का वाढते? पतंजली आयुर्वेदाने दिले कारणे आणि उपाय

Learn what causes excess pitta (body heat) according to Patanjali Ayurveda and how to control it naturally with Ayurvedic remedies.

Published On: 

Why does bile increase? Causes and remedies given by Patanjali Ayurveda

🕒 1 min read

भारतीय आयुर्वेदशास्त्रात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष मानले गेले आहेत. यातील पित्तदोष शरीरातील पाचनक्रिया, तापमान नियंत्रण आणि मानसिक प्रक्रियांशी निगडित आहे. अलीकडे पंतजलि आयुर्वेद (Patanjali Ayurveda) आणि बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या पुस्तकात पित्तदोषाची सखोल माहिती देण्यात आली आहे.

‘The Science of Ayurveda’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, पित्त वाढल्यामुळे शरीरात विविध त्रास निर्माण होतात. हे दोष अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव, वाईट जीवनशैली आणि हवामानातील बदलामुळे वाढतात. मसालेदार, आंबट, तेलकट पदार्थांचा अतिरेक हे मुख्य कारण असू शकते.

Why does bile increase? Causes and remedies given by Patanjali Ayurveda

पंचप्रकारच्या पित्तांमध्ये पाचक, रज्जक, साधक, भ्राजक आणि आलोचक पित्तांचा समावेश आहे. हे सर्व पित्तप्रकार शरीराच्या वेगवेगळ्या भागात कार्य करतात. उदाहरणार्थ, पाचक पित्त पाचनसंस्थेशी तर भ्राजक पित्त त्वचेच्या तेजाशी संबंधित असते.

पित्त वाढल्यावर थकवा, मुरुम, उलटी, तोंडाला दुर्गंधी, अंगात उष्णता, चिडचिडेपणा, आणि यकृताशी संबंधित त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणून पतंजली आयुर्वेदात “विरेचन” म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन पद्धतीचा सल्ला दिला जातो. ही एक आयुर्वेदिक शुद्धी प्रक्रिया असून पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी औषधींचा वापर केला जातो.

पित्त नियंत्रणासाठी योग्य आहार, शुद्ध जीवनशैली आणि आयुर्वेदिक उपचार आवश्यक आहेत, असं ‘पतंजली’चं संशोधन सुचवतं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Health News
MAHASATTA