🕒 1 min read
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात तरुणाने घुसण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला असून संबंधित तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं.
छत्तीसगडमधील जितेंद्रकुमार सिंह (वय 23) असं या व्यक्तीचं नाव असून, तो सकाळी 9.45 वाजता गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. परिसरात तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्याला हटकलं, मात्र त्याने संतापून आपला मोबाईल जमिनीवर फेकून दिला. त्यानंतर एका रहिवाशाच्या कारमागून लपून तो इमारतीत प्रवेश करू पाहत होता.
A young man tried to break into Salman’s Galaxy apartment; Police took him into custody
वेळीच लक्षात घेत पोलिसांनी त्याला अडवलं आणि ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने सलमानला भेटण्यासाठीच हा प्रकार केल्याचं सांगितलं. “पोलिस मला भेटू देत नव्हते म्हणून मी लपून गेलो,” असं त्याने कबूल केलं. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 329 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून त्यानंतर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. जानेवारी 2025 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबारही झाला होता. त्यानंतर सलमानने घराच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काच बसवली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, टॉप-4 मध्ये जागा निश्चित! दिल्ली स्पर्धेबाहेर
- ‘कौन बनेगा करोडपती’मधून अमिताभ बच्चन बाहेर? “कोण असणार नवा होस्ट?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





