Share

वाळूज दरोडा प्रकरणात संजय शिरसाट यांचा दावा; साडेपाच नव्हे, तब्बल साडेदहा किलो सोनं गायब

In the shocking Waluj robbery case, Minister Sanjay Shirsat says 10.5 kg gold was stolen instead of 5.5 kg. CID investigates as fake encounter allegations surface.

Published On: 

Shirsat claims in the Waluj robbery case; Not just five and a half, but ten and a half kilos of gold missing

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्योगिक परिसरातील दरोडा प्रकरण (Waluj robbery) आणि त्यात झालेल्या संशयित आरोपीच्या एन्काऊंटरमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता नवे वळण आलं असून, राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चकित करणारा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लड्डा यांच्या घरातून चोरीला गेलेलं सोनं साडेपाच किलो नव्हे, तर तब्बल साडेदहा किलो आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यासाठी मंत्री शिरसाट यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सांगितले की, या दरोड्यातून फक्त 32 तोळे सोनं परत मिळालं असून उर्वरित सोन्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. तसेच लड्डा कुटुंबीयांनी ज्या प्रमाणात सोनं चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे, त्यापेक्षा खूपच जास्त सोनं वास्तवात लुटल्याचा त्यांचा संशय आहे.

Sanjay Shirsat claims in the Waluj robbery case  

दरोड्याचा सूत्रधार अमोल खोतकर याच्या एन्काऊंटरबाबतही संशय व्यक्त होत आहे. अमोलच्या कुटुंबियांनी पोलीसांनी सुपारी घेऊन खोटं एन्काऊंटर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सध्या CID मार्फत चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री शिरसाट यांचं वक्तव्य प्रकरणात नवे वादंग निर्माण करत आहे.

दरम्यान, उद्योजक संतोष लड्डा यांनी माध्यमांशी बोलताना “मी 30 वर्षांपासून कष्ट करून हे सोनं मिळवलं, सर्व काही कागदोपत्री आहे,” असं स्पष्ट केलं. पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी आपल्याला कोणावरही संशय नसल्याचं सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Politics
MAHASATTA