Share

पाणीपुरी विकणाऱ्या तरुणाचं स्वप्न साकार; रामदास मारबदे यांची थेट इस्रोमध्ये तंत्रज्ञ पदावर निवड

Ramdas Marbade from Gondia, who supported his family by selling pani puri, cracked the ISRO technician exam through dedication and hard work. His story is a true inspiration.

Published On: 

The dream of a young man selling panipuri came true; Ramdas Marbade was directly selected as a technician in ISRO

🕒 1 min read

गोंदिया: परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, अभ्यास आणि प्रयत्नांची सातत्यपूर्ण जोड असेल, तर यश नक्की मिळतं, याचा उत्तम प्रत्यय गोंदिया जिल्ह्यातील रामदास मारबदे (Ramdas Marbade) यांच्या संघर्षातून येतो. पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या रामदास यांनी अखेर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) तंत्रज्ञ पदावर आपलं स्थान निर्माण केलं आहे.

तिरोडा तालुक्यातील खैरबोडी (नंदनगर) गावातील रामदास यांनी, घराची आर्थिक जबाबदारी उचलत, अभ्यासाला कधीही फाटा दिला नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्यांनी सोलापूर महापालिका आणि इस्रो या दोन्ही ठिकाणी यशस्वी निवड मिळवली आहे.

Ramdas Marbade was directly selected as a technician in ISRO

रामदास यांचे वडील शिक्षण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून निवृत्त झाले असून, सध्या शेती आणि पशुपालन करतात. आई गृहिणी असून, घरात पाच सदस्य आहेत. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून रामदास यांनी अभ्यासाचे सुयोग्य नियोजन केले. ते दररोज पाणीपुरीचा ठेला चालवायचे, दिवसातून एकदाच जेवायचे, आणि उरलेल्या वेळेत अभ्यास करत स्वतःची स्वप्नं पूर्ण केली.

त्यांनी दहावी, बारावी, आयटीआय (पंप ऑपरेटर मेकॅनिक), आणि बीए पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केली. 2019 पासून इस्रोसाठी तयारी सुरू करत त्यांनी हे यश मिळवलं आहे. त्यांचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Entertainment
MAHASATTA