🕒 1 min read
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात रात्रीपासून जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे भीमा नदीला (Bhima River) पुर आला आहे. या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Bhima river floods; Agriculture damaged in Baramati and Daund, Pabhe village lost contact
बारामतीमधील काटेवाडी भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पिंपळी-लिमटेक कॅनॉलला भगदाड पडल्याने पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतातील मातीदेखील वाहून गेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला आणि लवकर मदत मिळेल असे सांगितले.
ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाली आहे. काही इमारतींना भेगा पडल्याने अजित पवार यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- सलमान खानचा ‘सिकंदर’ आता OTT वर; अखेर प्रतीक्षा संपली!
- विराट आणि अनुष्का यांची अयोध्येला भेट; IPL 2025 प्लेऑफपूर्वी घेतले देवाचे आशीर्वाद
- विराटला चेंडू लागताच अनुष्काचा जीव झाला खालीवर; स्टेडियममध्येच झाली अस्वस्थ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





