Share

“अचानक मृत्यू होईल!” शेफालीच्या कुंडलीवर या ॲक्टरने आधीच वर्तवले होते भाकीत

Shefali Jariwala’s sudden death matches Paras Chhabra’s shocking prediction from old podcast.

Published On: 

"Sudden death will happen!" This actor had already predicted Shefali's horoscope

🕒 1 min read

Shefali Jariwala Death : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) अचानक मृत्यूमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. शुक्रवारी (27 जून) रात्री छातीत दुखू लागल्यानंतर पती पराग त्यागी यांनी तिला तातडीने मुंबईतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

या घटनेनंतर अभिनेता पारस छाबडाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांच्या ‘आबरा का डाबरा’ पॉडकास्टमध्ये शेफाली सहभागी झाली होती. तेव्हा पारसने तिच्या कुंडलीचा संदर्भ देत, ‘अचानक मृत्यू’ यासारखी शक्यता असल्याचं सूचित केलं होतं. त्याने म्हटलं होतं, “तुझ्या आठव्या घरात चंद्र, बुध आणि केतू बसले आहेत. चंद्र-केतूचा संयोग हा अत्यंत घातक असतो. हे घर अचानक मृत्यू, संकटं आणि अडचणींचं प्रतीक असतं.”

“Sudden death will happen!” This actor had already predicted Shefali’s horoscope

पारसने त्यावेळी असा इशारा दिला असला तरी त्याकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं. मात्र शेफालीच्या निधनानंतर त्याचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

शेफाली जरीवाला ही ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीत आली होती. तिची ओळख ‘कांटा लगा गर्ल’ अशी झाली. 2004 मध्ये ती ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही झळकली होती. बिग बॉस 13 मध्ये ती आणि पारस एकत्र होते. पती पराग त्यागी हा पारसचा जवळचा मित्र असल्यामुळे शोमध्ये पारस तिला ‘भाभी’ म्हणून संबोधायचा.

शेफालीच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना पारसने इंस्टाग्रामवर लिहिलं, “कोणाचं आयुष्य किती लिहिलं गेलंय, हे कोणालाच ठाऊक नाही. ओम शांती.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment News
MAHASATTA