Share

“काल सत्यनारायणाची पूजा, रात्री अचानक मृत्यू”, शेफाली जरीवालाच्या जाण्याआधी घरात नेमकं काय घडलं?

Actress Shefali Jariwala dies at 42 after sudden illness post religious ceremony. Family and police begin investigation.

Published On: 

"Yesterday Satyanarayan puja, sudden death at night", what exactly happened in the house before Shefali Jariwala's death?

🕒 1 min read

मुंबई : ‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) वयाच्या ४२व्या वर्षी निधन झालं आहे. काल (२८ जून) रात्री अचानक तिची प्रकृती ढासळल्यानं अंधेरीतील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून शवविच्छेदनासाठी शेफालीचं पार्थिव सध्या कूपर रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. तिचा पती पराग त्यागीसह चार जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

“Yesterday Satyanarayan puja, sudden death at night”,Shefali Jariwala Death

काल घरी सत्यनारायणाची पूजा झाली होती

शेफालीच्या घरी गुरुवारी (२७ जून) सत्यनारायणाची पूजा पार पडली होती. संध्याकाळी झोपेतून उठल्यानंतर तिला अचानक अशक्तपणा जाणवू लागला. तिचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्यानं तिला सलाईन लावण्यात आलं. परंतु काही वेळातच तिच्या प्रकृतीत आणखी घसरण झाली आणि रक्तदाब अचानक खूप वाढला.

कुटुंबीयांनी तातडीने तिच्या पालकांना बोलावलं. त्याचवेळी शेफाली बेशुद्ध पडली. तिच्या घरच्यांनी लगेच तिला अंधेरीतील बेली व्ह्यू रुग्णालयात नेलं. मात्र तिथं पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

फॉरेन्सिक तपास आणि पोलीस चौकशी सुरु

सकाळी फॉरेन्सिक टीमने तिच्या राहत्या घरी तपास केला. शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काँटा लगानं मिळवली होती प्रसिद्धी

शेफाली जरीवालाला २००२ मध्ये आलेल्या ‘काँटा लगा’ या गाण्यानं देशभरात ओळख मिळवून दिली. तिचा बोल्ड अंदाज आणि डान्सने ती रातोरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ‘नच बलिए’, ‘बिग बॉस १३’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.

शेफालीचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता. तिने अनेक म्युझिक अल्बम्स आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
News Entertainment
MAHASATTA