राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; दुपारी १२ ते ४ घराबाहेर पडणे टाळा, हवामान विभागाचा इशारा

राज्यात उकाडा वाढला असून हवामान विभागाने आज दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी.

mahasatta

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: राज्यातून मान्सून परतल्यानंतर आता 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. आज, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असा महत्त्वाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. पुणे, सातारा, बीड, जालना आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरीतही उष्ण आणि दमट हवामान राहील, असा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच, दुसरीकडे वाऱ्याची दिशा बदलत असल्याने पाऊस पडण्याची शक्यता काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत या भागात पाऊस पडल्यास नागरिकांना वाढत्या उन्हाच्या चटक्यांपासून काहीसा दिलासा मिळू शकेल.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या