इंडिया आघाडीच्या आंदोलनावर अभिजीत दिपके यांचे मोठे भाष्य; सरकार आणि न्यायालयाच्या भूमिकेवर उपस्थित केले सवाल

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनाला शुभेच्छा देत मोदी सरकार आणि न्यायालयाच्या भूमिकेवर सडकून टीका केली.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी काल दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाचे स्वागत केले आहे. हे एक मोठे आणि गरजेचे आंदोलन असल्याचे सांगत त्यांनी इंडिया आघाडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

'सीजेपी'च्या वतीने दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन केले जाणार होते. मात्र, मुंबईहून दिल्लीला पोहोचताच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिला पोलिसांच्या पथकाने विमानातच प्रवेश करून अभिजीत दिपके यांच्यासह सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले. ही कारवाई म्हणजे हुकूमशाही असून आपण अटकेसाठीच दिल्लीत आल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले होते.

या सर्व घडामोडी सुरू असतानाच दिपके यांच्या आजीचे निधन झाले. त्यांना आजीच्या अंतिम दर्शनासाठी हिंगोलीत पोहोचता आले नाही. मात्र, नंतर आपला लढा अर्धवट सोडून ते हिंगोलीला परतले. आज ते पुन्हा दिल्लीकडे रवाना होण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यांना दिल्लीतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या दिल्लीत असलेले सौरभ आणि आशुतोष हे पुढील रणनीती जाहीर करतील, अशी माहिती दिपके यांनी दिली.

पंतप्रधान मोदींना केवळ जंतर मंतरवरच नव्हे, तर एकूणच आंदोलनाचा प्रॉब्लेम असल्याचे दिपके म्हणाले. तसेच, पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर न्यायालयाने 'यावेळी मतदान करू शकत नसाल तर पुढच्या वेळी करा' असे म्हटले होते. यावर बोट ठेवत, "न्यायालय मोदींना 'यावेळी निवडणुका लढू नका, पुढच्या वेळी लढा' असे सांगू शकते का? जर त्यांना असे बोलता येत नसेल, तर मतदारांना हे कसे सांगता येईल?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

आता संपूर्ण देशभरात आंदोलने उभी राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. इंडिया आघाडीने काल थेट कोर्टावर काढलेला मोर्चा महत्त्वाचा होता, असे नमूद करत 'सीजेपी'देखील आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. यामुळे दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या