सूर्यकुमार यादवने दुबईत खरेदी केले आलिशान पेंटहाऊस, गौरी खानने केलेय घराचे डिझाईन

सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांनी दुबईत ‘शाहरुखज बाय डेन्यूब’मध्ये पहिले आलिशान घर खरेदी केले असून, त्याचे डिझाईन आर्किटेक्ट गौरी खानने केले आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेटस्टार सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी दुबईत एक आलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे. या दाम्पत्याने दुबईतील 'शाहरुखज बाय डेन्यूब' या लक्झरी प्रोजेक्टमध्ये आपले हे पहिले घर खरेदी करत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

या नव्या प्रोजेक्टची आणि घराची सर्वात मोठी खासियत बॉलिवूडशी जोडलेली आहे. या लक्झरी प्रकल्पाचे नाव सुपरस्टार शाहरुख खान याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच, सूर्यकुमारच्या या नव्या पेंटहाऊसचे डिझाईन शाहरुखची पत्नी आणि आर्किटेक्ट गौरी खान हिने केले आहे.

दुबईतील या लक्झरी प्रोजेक्टमधील नव्या गुंतवणुकीबाबत आणि आपल्या पहिल्या घराबाबत स्वतः सूर्यकुमार यादवने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या