शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाचा टीझर कधी रिलीज होणार? मोठी माहिती समोर

शाहरुख खानच्या ४५० कोटी बजेट असलेल्या ‘किंग’ चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसानिमित्त २ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या बहुचर्चित चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर शाहरुखच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर, म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या एका रिपोर्टमधून या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

२०२३ नंतर तब्बल तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर परतत आहे. या चित्रपटासाठी तब्बल ४५० कोटी रुपयांचा निर्मिती खर्च आल्याचे सांगितले जात आहे. २४ डिसेंबर २०२६ ला ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, सध्या या चित्रपटाच्या थिएटर रिलीजसाठी अवघे ७० दिवस शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी शाहरुखच्या वाढदिवशी 'किंग'मधील त्याचा पहिला लूक समोर आला होता. त्यामुळे यंदाच्या वाढदिवशी चाहत्यांना टीझरची भेट देण्याचे निर्मात्यांचे नियोजन आहे. या टीझरमध्ये शाहरुखचा एक नवा आणि कधीही न पाहिलेला अंदाज, खास स्टाईल, रुबाब आणि दमदार संवाद पाहायला मिळतील. याच टीझरसोबत चित्रपटाच्या जागतिक मार्केटिंग मोहिमेचीही सुरुवात होणार आहे.

'पठाण' आणि 'जवान'पेक्षाही हा चित्रपट ॲक्शन, थ्रिल आणि संगीताच्या बाबतीत एक पाऊल पुढे असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, या मल्टी-स्टारर चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरचा स्पेशल अपीअरन्स असणार आहे. ती 'डॅडी कूल' या गाण्यावर शाहरुखसोबत थिरकताना दिसेल, ज्याचे शूटिंग ऑक्टोबर महिन्यात साऊथ आफ्रिकेत करण्याचा निर्मात्यांचा प्लान आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या