एकनाथ खडसेंच्या निवासस्थानाची ड्रोनद्वारे ‘रेकी’? पोलिसांत धाव घेत केली चौकशीची मागणी

एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनद्वारे रेकी झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी खुद्द खडसेंनी पोलिसांत धाव घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Eknath Khadse suspected drone recce at his residence in Jalgaon

जळगाव, 3 ऑक्टोबर: जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत असून, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुद्द एकनाथ खडसे यांनीच आपल्या घरावर पाळत ठेवली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या संशयास्पद प्रकारानंतर एकनाथ खडसे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. आपल्या निवासस्थानाची ड्रोनद्वारे रेकी का केली जात आहे, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी याआधीही अशाच प्रकारची भीती व्यक्त केली होती. आपले कॉल रेकॉर्ड केले जात असल्याचा संशय त्यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. त्यातच आता थेट निवासस्थानावर ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या