Share

भाजप आमदार राजेंद्र राऊतांची रोहित पवारांवर एकेरी भाषेत टीका; कुटुंबाच्या नावावरही गंभीर आरोप

भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत पवार कुटुंबाच्या काळ्या धंद्यांचा उल्लेख करत थेट इशारा दिला आहे.

Published On: 

Rajendra Raut criticizes Rohit Pawar over drought and politics

प्रतिनिधी, 3 ऑक्टोबर: राज्यात दुष्काळाचे सावट असताना राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली आहे. राऊत यांनी पवार कुटुंबावरही गंभीर आरोप केले आहेत.

राऊत यांनी रोहित पवारांना उद्देशून म्हटले आहे की, “अरे रोहित बाळा तुझ्या काकाने सांगितलं होतं थोडक्यात हुकला. उपटसुंब्या कोणाला म्हणतो? तूच आजोबांच्या जीवावर उपटसुंब्या आहेस.” आजोबांकडून माहिती घेऊन आयुष्यात बेडकासारख्या उड्या कोणी मारल्या, याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

दुष्काळात आपला मतदारसंघ सांभाळण्यासाठी आपण आणि आपले नेते देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचे राऊत यांनी सुनावले. तसेच, “माझ्या मतदारसंघात येण्याच्या गोष्टी करू नको. तुझ्या कर्जतमध्ये येऊन मी काय करणार आहे हे बघून घे,” असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

पवार कुटुंबावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “आम्ही संप्रदायातील माणसं आहोत, रात्रीचे काळे धंदे कोणाचे आहेत हे राज्याला माहिती आहे. तुमच्या खानदानाचे काळे धंदे बाहेर निघू लागले की तोंड लपवून बसू नकोस.” सध्या रोहित पवार हे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना आक्रमकपणे घेरताना दिसत आहेत. त्यामुळे आता राऊत यांच्या या बोचऱ्या टीकेला ते काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

🕘 संबंधित बातम्या