प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: नागपूरजवळील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघातावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी सविस्तर खुलासा केला आहे. अपघातग्रस्त गाडीत आपला मुलगा नव्हता, तर तो दुसऱ्या वाहनातून प्रवास करत होता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांचे आरोप फेटाळले. या दुर्दैवी घटनेत जागीच मृत्यू झालेला तरुण आपल्या मुलासारखाच होता आणि त्याच्या कुटुंबाशी आपले अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, अशी भावना फुके यांनी व्यक्त केली. या धक्क्यातून आपले कुटुंब अद्याप सावरले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोणतीही ठोस माहिती समोर येण्यापूर्वीच जाणीवपूर्वक बदनामी करणे आक्षेपार्ह असल्याचे फुके म्हणाले. राजकीय स्वार्थासाठी या घटनेचा वापर केला जात असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सत्य आणि न्याय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघात कसा घडला, हे पोलिसांच्या निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होईल. आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्त कार डॉ. परिणय फुके यांच्या मालकीची असून ती त्यांचा मुलगा यथार्थ चालवत असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. तसेच, सत्तेचा वापर करून हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यानंतर आता फुके यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- फ्रँचायझी लीग्जवर ICC चा अंकुश? नव्या नियमांचा MLC आणि ILT20 ला बसणार मोठा फटका
- चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाबाबत ऋतुराज गायकवाडला एस बद्रीनाथचा थेट इशारा
- आकाश चोप्राने निवडली चौथ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन; ईशान किशन, ऋतुराजबाबत सुचवला मोठा बदल




