प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेटस्टार सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी दुबईत एक आलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे. या दाम्पत्याने दुबईतील 'शाहरुखज बाय डेन्यूब' या लक्झरी प्रोजेक्टमध्ये आपले हे पहिले घर खरेदी करत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
या नव्या प्रोजेक्टची आणि घराची सर्वात मोठी खासियत बॉलिवूडशी जोडलेली आहे. या लक्झरी प्रकल्पाचे नाव सुपरस्टार शाहरुख खान याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच, सूर्यकुमारच्या या नव्या पेंटहाऊसचे डिझाईन शाहरुखची पत्नी आणि आर्किटेक्ट गौरी खान हिने केले आहे.
दुबईतील या लक्झरी प्रोजेक्टमधील नव्या गुंतवणुकीबाबत आणि आपल्या पहिल्या घराबाबत स्वतः सूर्यकुमार यादवने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबई इंडियन्स संघात मोठ्या उलथापालथीचे संकेत; फ्रँचायझीच्या ‘त्या’ पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
- IND vs NZ : वैभव सूर्यवंशीची नाहक चर्चा टीमसाठी नुकसानकारक, बॅटिंग कोच सितांशू कोटक यांचे स्पष्ट मत
- नागपूरमध्ये क्रिकेट सामन्यात माकडाची घुसखोरी; महिला खेळाडूच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल





