ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत; कारण… : पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, कारण तसे झाल्यास मोदींचा पराभव किंवा निवडणूक गैरप्रकार उघड होतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू असतानाच, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा केला आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, कारण तसे झाल्यास मोदींचा पराभव किंवा निवडणुकीतील गैरप्रकार समोर येतील, असे धक्कादायक विधान चव्हाण यांनी केले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यासाठी त्यांनी स्वतःला अटकही करवून घेतली आहे. राजीनामा मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीनेही जोरदार आंदोलन केल्याने दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलेली विधाने लक्षवेधी ठरली आहेत.

सध्या निवडणूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले असून सरकार घाबरलेले आहे, असे चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले. तरुणांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात अराजकता माजवल्याचा आरोप चुकीचा असल्याचे सांगून ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार जेवढे दिवस राजीनामा देणार नाहीत, तेवढे ते आमच्यासाठी चांगलेच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना केवळ निवेदन द्यायचे होते, त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटायला हवे होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच केंद्र आणि राज्यातील सरकार सत्तेवरून खाली खेचले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरही सडकून टीका केली. दुष्काळावर उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, मात्र या गंभीर परिस्थितीकडे कोणाचेच लक्ष नाही. राज्य सरकार केवळ जाहिरातबाजी करण्यावर भर देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुण्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सहा वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून विजय खेचून आणल्याची आठवण त्यांनी सांगितली. यावेळीही भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर मतदार महाविकास आघाडीला विजयी करतील, याबद्दल त्यांनी शंका नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव या उच्चशिक्षित असून त्या विधानसभा गाजवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र आपले उमेदवार सहज निवडून येतील अशा भ्रमात न राहता कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या