प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर दुपारी दोन वाजता या प्रकरणाच्या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत एकनाथ शिंदे यांची बाजू वकील ध्रुव मेहता मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, मतचोरीचा आरोप करत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी याचिका दाखल करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीतील नेत्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर विराट मोर्चा काढला.
दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांच्या कायदेशीर पथकाकडून ही याचिका दाखल करण्यात आली. या निमित्ताने इंडिया आघाडीने आपली एकजूट दाखवून दिली असून, आठवडाभरात सलग पाचव्यांदा असे शक्तिप्रदर्शन करत केंद्र सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- १९९३ च्या बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावल्या होत्या नीलकांती पाटेकर; नाना पाटेकरांनी घेतली होती संजय दत्तसोबत काम न करण्याची शपथ
- आणखी एक ठाकरे राजकारणात? रविवारच्या आंदोलनातील तेजस ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर चर्चांना उधाण
- ५६ वर्षांपूर्वीचे धर्मेंद्रचे ते सुपरहिट गाणे, मोहम्मद रफींचा आवाज आज Gen Z आणि Millennials साठी ठरतोय खास







