ग्रीसमध्ये शुभमन गिलचा मिस्ट्री गर्लला मिठी मारून डान्स, डीजे पार्टीतील फोटो व्हायरल

ग्रीसमधील डीजे पार्टीत शुभमन गिल एका मुलीसोबत डान्स करतानाचा फोटो व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तिच्या ओळखीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: भारतीय कर्णधार शुभमन गिल सध्या त्याच्या एका व्हायरल फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्रीसमध्ये झालेल्या एका डीजे पार्टीतील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.

समोर आलेल्या या फोटोंमध्ये शुभमन गिल एका मुलीला मिठी मारून डान्स करताना दिसत आहे. या पार्टीच्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूला मोठी गर्दी असल्याचेही पाहायला मिळत आहे.

शुभमन ज्या मुलीसोबत नाचत आहे, तिचा चेहरा या फोटोत स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण झाले असून, ही मुलगी नेमकी कोण आहे यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

शुभमन गिलचे नाव याआधीही इतर मुलींसोबत जोडले गेले आहे. यामध्ये सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नावांचाही समावेश आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या