प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: ‘अक्का’ या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री राधिका आपटेने आपण नास्तिक असल्याचा खुलासा केला आहे. आपला देवावर विश्वास नसून निसर्ग हीच सर्वात मोठी शक्ती असल्याचे राधिकाने म्हटले आहे. लोकांनी मूर्तीची पूजा करण्याऐवजी निसर्गाची पूजा केली पाहिजे, असे मत तिने यावेळी व्यक्त केले.
याच मुलाखतीत तिच्यासोबत उपस्थित असलेल्या अभिनेत्री कीर्ती सुरेशने मात्र देवावर आपला विश्वास असल्याचे सांगितले. कीर्ती म्हणाली, “कोणतीतरी दैवी शक्ती नक्कीच आहे आणि माझी देवावर श्रद्धा आहे. मला माहीत असलेल्या पद्धतीने मी प्रार्थनाही करते, पण मी स्वतःला धार्मिक मानत नाही.”
राधिका आपटे आणि कीर्ती सुरेश यांची मुख्य भूमिका असलेली ‘अक्का’ ही सीरिज ३० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंडरवर्ल्डवर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये निष्ठा, सूड आणि विश्वासघाताचे नाट्य रंगणार आहे. नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंट यांनी मिळून या सीरिजची निर्मिती केली असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून धर्मराज शेट्टी लेखन आणि दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
या सीरिजमध्ये महेश मांजरेकर, तन्वी आझमी, मोनिका पनवार आणि अंशुमन पुष्कर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नेटफ्लिक्स इंडियाच्या ‘सीरिज हेड’ तान्या बामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अक्का' या सीरिजमध्ये स्त्रिया केवळ कथेचा एक भाग नसून त्या सत्तेच्या अगदी केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळेल.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेते अभिजीत केळकर यांच्या जीवाला धोका; फेसबुक पोस्टद्वारे फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत
- मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी विवाह करणाऱ्या पत्रकार निधी राझदान कोण आहेत?
- वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर ८ गडी राखून विजय; WTC गुणतालिकेत केली १२ गुणांची कमाई




