Huawei Mate 90 Pro लाँच; 12,000 nits ब्राईटनेस, 6600mAh बॅटरीसह मिळतात भन्नाट फीचर्स

हुवावेने आपला नवीन Mate 90 Pro स्मार्टफोन लाँच केला असून, यात १२,००० निट्स ब्राईटनेस, १००W फास्ट चार्जिंग आणि उत्कृष्ट कॅमेरा मिळतो.

Huawei ने आणला जबरदस्त फोन! 12,000 nits ब्राइटनेससह Mate 90 Pro मध्ये मिळणार भन्नाट फीचर्स

प्रतिनिधी, 3 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात टेक कंपन्यांमध्ये नवीन उत्पादने लाँच करण्याची चुरस पाहायला मिळत आहे. यातच आता हुवावेने चीनमध्ये आपला नवीन ‘मेट ९० प्रो’ (Huawei Mate 90 Pro) स्मार्टफोन लाँच करून ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारा १२,००० निट्सचा पीक ब्राईटनेस. या स्मार्टफोनमध्ये ६.७५ इंचाचा LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला असून, तो १ ते १२० हर्ट्झ ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी याला तिसऱ्या जनरेशनचे कुनलुन (Kunlun) ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे.

दमदार परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये हुवावेचा Kirin 9035 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन HarmonyOS 7.0 या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. ग्राहकांसाठी यामध्ये १२ जीबी आणि १६ जीबी रॅमचे पर्याय देण्यात आले असून, २५६ जीबी ते १ टीबीपर्यंत स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच फोनमध्ये ६६०० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून, ती १०० वॅट वायर्ड सुपरचार्ज आणि ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये रिव्हर्स चार्जिंगचीही सुविधा आहे.

फोटोग्राफीच्या चाहत्यांसाठी ‘हुवावे मेट ९० प्रो’मध्ये उत्कृष्ट ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्ट आणि व्हेरिएबल अपर्चरसह (F1.4 ते F4.0) ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ४० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड लेन्स आणि ५० मेगापिक्सलचा मॅक्रो टेलिफोटो कॅमेरा मिळतो. हा कॅमेरा १००x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड फ्रंट कॅमेरा आणि ३डी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे. सध्या हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला असून, याच्या १२ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत ६,९९९ युआन (भारतीय चलनानुसार सुमारे १ लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. तर १६ जीबी + १ टीबी टॉप मॉडेलची किंमत ९,९९९ युआन (सुमारे १.४४ लाख रुपये) आहे. मात्र, हा फोन भारतात कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या