अभिषेक शर्माशी लग्न, गिलसोबत हुक अप; अनाया बांगरचे श्रेयस अय्यरबाबत मोठे विधान

माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया हिने एका मुलाखतीत अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबत रंजक उत्तरे दिली आहेत.

mahasatta

प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिचा एका मुलाखतीतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या मुलाखतीत तिने भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल काही रंजक उत्तरे दिली आहेत.

'कृष्णक आत्रे' या यूट्यूब चॅनलवरील एका रॅपिड-फायर राऊंडमध्ये अनायाला काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी तिला तीन क्रिकेटपटूंसाठी 'किल', 'मॅरी' आणि 'हुक अप' यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला थोडी गोंधळलेली अनाया नंतर मात्र व्यक्त झाली; तिने अभिषेक शर्मासोबत 'मॅरी' (लग्न), शुभमन गिलसोबत 'हुक अप' आणि श्रेयस अय्यरला 'किल' करण्याचा पर्याय निवडला. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे.

अनाया पूर्वी आर्यन या नावाने ओळखली जायची आणि तिने मुंबईकडून पुरुषांच्या वयोगट क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल हे तिचे सहकारी खेळाडू होते. मात्र, २०२२ मध्ये तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता ही वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून तिची क्रिकेटबद्दलची ओढ अद्यापही कायम आहे.

आपली क्रिकेट कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी अनाया आता ऑस्ट्रेलियाला जाण्याची योजना आखत आहे. पुढील हंगामापासून ती महिला बिग बॅश लीगमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडू म्हणून खेळताना दिसू शकते. याशिवाय, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर बीसीसीआयनेही ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्याचा विचार करावा, असे आवाहन तिने केले आहे.

याबाबत 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना अनाया म्हणाली, "ऑस्ट्रेलियाने जे केले आहे, ते जर बीसीसीआयने केले, तर ती एक उत्तम सुरुवात होईल."

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या