प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: सनरायझर्स हैदराबादची (SRH) मालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, काव्या हैदराबाद संघाची मालकीण असली तरी तिचा होणारा नवरा अनिरुद्ध भलत्याच संघाचा कट्टर चाहता असल्याची रंजक बाब समोर आली आहे.
काव्याचे आई-वडील कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. आगामी २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या बहुचर्चित लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आयपीएलमधील त्यांच्या पसंतीचीही चर्चा रंगली आहे. काव्याच्या मालकीचा हैदराबाद संघ असला तरी, होणाऱ्या नवऱ्याला मात्र तो संघ फारसा आवडत नाही. अनिरुद्धला आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ आवडतो आणि तो 'चेन्नई सुपर किंग्ज'चा कट्टर चाहता आहे.
आता लग्नानंतर अनिरुद्ध आपली पसंती बदलून पत्नीच्या म्हणजेच हैदराबाद संघाला पाठिंबा देणार का, असा गमतीशीर प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारतीय गोलंदाजीवर सुनील गावस्कर भडकले, दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘हार्दिकची जागा…’
- न्यूझीलंड दौऱ्यानंतर मोहम्मद शमीला आणखी एक धक्का; आता रणजी संघातूनही बाहेर
- IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी शुभमन गिल फ्लॉप, रणजी करंडकात एका धावेवर क्लिन बोल्ड




