प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन आणि सुप्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोघेही ग्रीसमध्ये शाही विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मात्र, या संभाव्य लग्नाबाबत दोन्ही कुटुंबांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या चर्चेनुसार, काव्या आणि अनिरुद्ध यांचा विवाह ११ नोव्हेंबरला पार पडू शकतो. त्यानंतर २१ नोव्हेंबरला चेन्नईमध्ये एका भव्य रिसेप्शनचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला क्रिकेट, चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
ग्रीसमधील नयनरम्य समुद्रकिनारे नेहमीच श्रीमंत कुटुंबांच्या पसंतीस उतरतात. सेंटोरिनी, मायकोनोस आणि अथेन्स ही विवाहसोहळ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाणे आहेत. येथे एखाद्या आलिशान व्हेन्यू किंवा रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे सुमारे १५ ते ४५ लाख रुपयांच्या घरात असते.
ग्रीसमध्ये १०० ते १५० पाहुण्यांच्या उपस्थितीत तीन-चार दिवसांचा विवाहसोहळा करायचा झाल्यास सुमारे १.५ कोटी ते ३.५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. प्रवास, सजावट आणि पाहुण्यांच्या निवासाचा खर्च मिळून हा आकडा आणखी वाढतो. विशेष म्हणजे, येथील केटरिंग खर्चात जेवणाच्या एका प्लेटची किंमत साधारण १५ हजार ते ३५ हजार रुपये असू शकते. अर्थात, काव्या आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाच्या प्रत्यक्ष खर्चाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2027 च्या मिनी ऑक्शनची तारीख ठरली; १६ डिसेंबरला गोव्यात रंगणार लिलाव
- महिला जयवर्धने यांची मुंबई इंडियन्समधून एक्झिट! नव्या हेड कोचसाठी ५ दिग्गजांची नावे शॉर्टलिस्ट
- काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात? ग्रीसमध्ये पार पडणार लग्नसोहळा




