प्रतिनिधी, 17 ऑक्टोबर: प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांनीही अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना काव्या यांच्या कुटुंबाने लग्नाची निमंत्रण पत्रिका दिल्यानंतर ही बातमी देशभरात पसरली आहे.
कोट्यधीश काव्या मारन आयपीएल सामन्यांदरम्यान नेहमीच स्टेडियममध्ये उपस्थित असतात. त्या आणि अनिरुद्ध एकमेकांच्या प्रेमात नेमके कधी पडले, याची निश्चित माहिती समोर आलेली नाही. मात्र, ते बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. जून २०२५ मध्ये रेडिटवर एका व्हायरल पोस्टद्वारे त्यांच्या डेटिंग आणि लग्नाबाबत पहिल्यांदा चर्चा सुरू झाली होती. तसेच २०२५ मध्येच ते दोघे एकत्र फिरत असल्याची एक पोस्टही व्हायरल झाली होती.
डेटिंगच्या बातम्या समोर आल्यानंतर अनिरुद्धने सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया दिली होती. 'आम्ही लग्न करणार नाहीत. अफवा पसरवणे बंद करा,' असे त्याने त्यावेळी म्हटले होते. मात्र, यावर्षी अनिरुद्धच्या काकांनी त्याचे लग्न एका मोठ्या घरातील मुलीशी होणार असल्याचे संकेत दिले होते.
आता या दोघांचेही लग्न निश्चित झाल्याचे सांगितले जात असून, येत्या ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुरुवातीच्या काळात विराट कोहली खूपच अहंकारी होता; एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा
- दारूचं व्यसन आणि २६ दिवस रिहॅबमध्ये; युझवेंद्र चहलनं सांगितला घटस्फोटाचा कठीण काळ
- आयपीएल टीमची मालक काव्या मारन होणार रजनीकांत यांची सून; जाणून घ्या तिचे शिक्षण आणि संपत्ती




