मुंबईतून मॉन्सूनची माघार; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून पाऊस परतणार

मुंबईतून मॉन्सूनने माघार घेतली असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून पाऊस परतीचा प्रवास पूर्ण करेल.

Monsoon withdrawal update IMD announces monsoon retreat from Mumbai

प्रतिनिधी, 3 ऑक्टोबर: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईतून ३ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने (Monsoon) माघार घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशातील इतर भागांतूनही पाऊस निरोप घेत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या १३ राज्यांमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सूनने पाठ फिरवल्याने राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला एल निनोचा अंदाज खरा ठरला आहे. देशभरात जून ते सप्टेंबर या हंगामात सरासरी केवळ ८७.४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे २००१ नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मॉन्सून हंगाम ठरला आहे.

पावसाअभावी राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. ऑक्टोबर महिन्यातच अनेक भागांतील विहिरी आटल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाराटंचाईमुळे अनेक शेतकरी आपली जनावरे विकण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, २०२७ मध्ये याहूनही भयंकर स्थिती निर्माण होण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने सरकारकडून आतापासूनच महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.

Maha Satta

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या