दिल्ली, 13 नोव्हेंबर: दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या. "ज्या दिवशी भाऊ गेला, त्याच दिवशी विलिनीकरणाचा मुद्दा संपला," अशी भावनिक प्रतिक्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.
अजित पवार गटातील नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत वाढलेल्या भेटीगाठींमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे सर्वपक्षीय नेत्यांना भेटत असतात, त्यामुळे यात नवीन काहीच नाही. सध्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादा असताना विलिनीकरणावर चर्चा सुरू होत्या. त्यांच्या जाण्यानंतर दोन-तीन दिवस काही घडामोडी झाल्या, मात्र अजितदादांच्या निधनाने सर्वच संपले असून दोन्ही गट आता एकत्र येणार नाहीत, असे सुळे यांनी सांगितले.
अजित पवार गटाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सुळे म्हणाल्या. या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “दुसऱ्यांच्या घरात मी का डोकावू?” असा थेट सवाल केला.
दुसरीकडे, दिवाळीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांकडे असलेले अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीला हवे असल्यामुळे आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त इतर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीच्या फराळानंतर गॅस आणि ॲसिडिटी वाढलीये? पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
- राज्यात थंडीची चाहूल! तापमानात मोठी घट होणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
- दुखापतीच्या नैराश्यातून मुंबई पोलीस दलातील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या




