पुणे शिक्षक मतदारसंघ: सस्पेन्स संपला, एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का; सचिन सानपांना पाठिंबा

पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला असून, भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला आहे. या निवडणुकीत आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला असून, हा भारतीय जनता पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

महायुतीत या जागेवरून सुरुवातीपासूनच वेगळी भूमिका पाहायला मिळत होती. एकनाथ शिंदे या मतदारसंघासाठी आग्रही होते, मात्र भाजपही माघार घेण्यास तयार नव्हता. अखेर भाजपने मित्रपक्षांसोबत मिळून कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा दिला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या मैत्रीपूर्ण लढतीवर शिक्कामोर्तब झाले.

यापूर्वी शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तरीही शिंदे गट निवडणूक लढवण्यावर ठाम राहिला आणि त्यांनी थेट उदय सामंत यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सचिन सानप या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला.

या राजकीय घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडेही पाठ फिरवली होती. यादरम्यान त्यांचा दिल्ली दौराही पार पडला. काल रात्री उशिरा 'नंदनवन' या निवासस्थानी शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी ही मोठी खेळी करण्यात आली. आता या अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या