क्राइस्टचर्च, 22 ऑक्टोबर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तब्बल १४३० दिवसांनंतर दमदार पुनरागमन केले आहे. ख्राईस्टचर्च येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात त्याने गोलंदाजीला सुरुवात करताच एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
उजव्या हाताच्या या गोलंदाजाने आपल्या स्पेलचे पहिलेच दोन चेंडू निर्धाव (डॉट) टाकले. या कामगिरीसह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-२० पॉवरप्लेमध्ये एकूण ८९३ निर्धाव चेंडूंची नोंद झाली आहे.
निर्धाव चेंडू टाकण्यात माहीर असलेल्या भुवनेश्वरच्या नावावर आयपीएलमध्येही सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा विक्रम आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९४४ निर्धाव चेंडू टाकले आहेत.
भुवनेश्वर कुमारसाठी ख्राईस्टचर्च येथील हा सामना अतिशय खास ठरला आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२२ साली न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता. आता पुन्हा एकदा याच संघाविरुद्ध तब्बल १४३० दिवसांनी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ 1st T20: पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला संधी; जाणून घ्या भारताची Playing XI
- जपानमध्ये भारतीय पॅरा जलतरणपटूचे लज्जास्पद कृत्य; हॉटेल महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, आजीवन बंदीची शक्यता
- विनोद कांबळी रडले, राडा झाला अन्…; रोहित शर्माने सांगितला क्रिकेटर बनण्यामागचा तो किस्सा




