प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये रोहित शर्माची निवड झाली आहे. ४ नोव्हेंबरपासून सुरू होणारी पाच वनडे सामन्यांची ही मालिका रोहितसाठी अत्यंत महत्त्वाची असून, एका खास विक्रमाला गवसणी घालण्याची ही त्याच्यासाठी शेवटची संधी ठरणार आहे.
क्रिकेट जगतात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (SENA) या देशांना विशेष महत्त्व आहे. या चारही देशांविरुद्ध वनडे शतक झळकावण्याची कमाल आतापर्यंत केवळ सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि शिखर धवन या तीनच भारतीय फलंदाजांनी केली आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय शतक झळकावले आहे. परंतु, न्यूझीलंडमध्ये त्याच्या नावावर अद्याप एकही शतक नाही. त्यामुळे सचिन, विराट आणि धवन यांच्या या खास यादीत स्थान मिळवण्यासाठी त्याला या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावावे लागेल.
रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा न्यूझीलंड दौरा असू शकतो, त्यामुळे हा त्याचा 'लास्ट चान्स' मानला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही वनडे मालिका ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. या पाच सामन्यांमध्ये शतक झळकावून रोहित SENA देशांमध्ये शतक करणारा चौथा भारतीय खेळाडू बनतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- काव्या मारन SRH ची मालकीण असली तरी, होणारा नवरा अनिरुद्ध रविचंदर आहे ‘या’ संघाचा मोठा फॅन
- भारतीय गोलंदाजीवर सुनील गावस्कर भडकले, दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘हार्दिकची जागा…’
- न्यूझीलंड दौऱ्यानंतर मोहम्मद शमीला आणखी एक धक्का; आता रणजी संघातूनही बाहेर




