अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना राज्य सरकारची मोठी भेट; दिवाळीपूर्वी मिळणार २ हजार रुपये

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना भाऊबीजेची भेट म्हणून राज्य सरकार प्रत्येकी दोन हजार रुपये देणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

mahasatta

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांना शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जाणार आहेत.

राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सध्या १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० मदतनीस अशी एकूण २,१४,०९७ पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत महिलांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार असून, शासनाने यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान बालकांच्या पोषणाची महत्त्वाची जबाबदारी या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पार पाडत असतात. या महिलांची दिवाळी गोड व्हावी, याच उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या