प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. इंस्टाग्रामवर तिचे १ कोटी ४८ लाख फॉलोवर्स असले, तरी ती स्वतः मात्र जगात फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते.
ती फॉलो करत असलेली ही एकमेव व्यक्ती ना शाहरुख खान आहे, ना अमिताभ बच्चन. ऐश्वर्या इंस्टाग्रामवर फक्त तिचा पती अभिषेक बच्चन यालाच फॉलो करते. अलीकडेच एका फॅशन वीकमधील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
गेल्या तीन दशकांपासून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. 'प्यार हो गया' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न झाले असून, त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे.
लग्नापूर्वी ऐश्वर्याचे खासगी आयुष्य प्रचंड चर्चेत राहिले होते. ती बॉलिवूड अभिनेता सलमान खानला डेट करत होती. मात्र, पुढे एका वाईट वळणावर ऐश्वर्या आणि सलमान खान यांचे ब्रेकअप झाले.





