सारा तेंडुलकरने कुटुंबासोबत साजरा केला २९ वा वाढदिवस; पण ‘त्या’ एका कृतीवरून चाहते विचारतायत सवाल

सारा तेंडुलकरने नुकताच कुटुंबासोबत आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. मात्र, सेलिब्रेशननंतर वेगवेगळ्या गाड्यांमधून घरी जाण्यावरून चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

mahasatta

प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने नुकताच आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिने मैत्रिणींसोबत, तर मुख्य वाढदिवसाच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवला. मात्र, या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातील एका गोष्टीवरून चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

तेंडुलकर कुटुंबाने एकत्र मिळून साराचा वाढदिवस साजरा केला. मात्र, जेवणानंतर घरी परतताना घरातील सर्व सदस्य वेगवेगळ्या गाड्यांमधून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. एकाच घरात राहणारे कुटुंबातील लोक वेगवेगळ्या कारने घरी का गेले, असा सवाल आता चाहत्यांना पडला आहे.

या सेलिब्रेशनसाठी साराने अत्यंत साधा आणि कॅज्युअल लूक निवडला होता. कुटुंबासोबतच्या जेवणासाठी तिने सलवार सूट परिधान केला होता. मोकळे केस आणि साध्या मेकअपमध्ये तिने सर्वांची मने जिंकली. या वेळी सचिन आणि अंजली तेंडुलकर यांचा लूकही आकर्षक दिसत होता आणि ते त्यांच्या स्वतःच्या गाडीत बसून गेल्याचे पाहायला मिळाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जातो. इन्स्टाग्रामवर तिचे ९८ लाख फॉलोअर्स असून तिथे पोस्ट शेअर करून ती मोठी रक्कम कमावते. याशिवाय ती स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय, मॉडेलिंग आणि फॅशन ब्रँड्ससोबतही काम करते. काही वृत्तांनुसार तिची एकूण संपत्ती ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलेली सारा स्वतः एक न्यूट्रिशियनिस्ट आहे. तिची अंधेरीतील लोखंडवाला परिसरात स्वतःची पिलेट्स अॅकेडमी देखील आहे. महिलांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर या अॅकेडमीत भर दिला जातो. महिलांनी निरोगी आयुष्य आणि व्यायामाबाबत जागरूक राहावे, असे सारा नेहमी सांगत असते.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या