एकदिवसीय इतिहासात दुसऱ्यांदाच असं घडलं! रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाच सामन्यात शून्यावर बाद

माऊंट माउंगानुई येथे न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली शून्यावर बाद झाले आहेत. वनडे इतिहासात ही केवळ दुसरीच वेळ आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय डावाची अतिशय खराब सुरुवात झाली आहे. या सामन्यात दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही शून्यावर बाद झाले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हे दोन्ही खेळाडू एकाच सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने ३३३ धावा उभारल्या होत्या. या ३३४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय आघाडीची फळी सुरुवातीलाच कोसळली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात कहर करत भारताला मोठा धक्का दिला. त्याने एकाच षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिन्ही फलंदाजांना बाद केले.

मॅट हेन्रीच्या या भेदक गोलंदाजीसमोर रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर 'गोल्डन डक'चा शिकार ठरला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीलाही केवळ चार चेंडूंचा सामना करता आला आणि तोही शून्यावरच माघारी परतला.

यापूर्वी १५ वर्षांपूर्वी २०१० मध्ये दाम्बुला येथे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताचे हे दोन्ही माजी कर्णधार एकाच वेळी शून्यावर बाद झाले होते. ललित कालिदास यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत एक पोस्ट करत म्हटले आहे की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या कारकिर्दीत केवळ दुसऱ्यांदाच एकाच वनडेत शून्यावर बाद झाले आहेत. रो-को एकाच वनडेत शून्यावर: भारत विरुद्ध श्रीलंका, दाम्बुला २०१०, भारत विरुद्ध न्यूझीलंड, माऊंट माउंगानुई २०२६.”

📌 महत्त्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या