काव्या मारन SRH ची मालकीण असली तरी, होणारा नवरा अनिरुद्ध रविचंदर आहे ‘या’ संघाचा मोठा फॅन

काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काव्या हैदराबाद संघाची मालकीण असली तरी अनिरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा चाहता आहे.

mahasatta

प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: सनरायझर्स हैदराबादची (SRH) मालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, काव्या हैदराबाद संघाची मालकीण असली तरी तिचा होणारा नवरा अनिरुद्ध भलत्याच संघाचा कट्टर चाहता असल्याची रंजक बाब समोर आली आहे.

काव्याचे आई-वडील कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. आगामी २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

या बहुचर्चित लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आयपीएलमधील त्यांच्या पसंतीचीही चर्चा रंगली आहे. काव्याच्या मालकीचा हैदराबाद संघ असला तरी, होणाऱ्या नवऱ्याला मात्र तो संघ फारसा आवडत नाही. अनिरुद्धला आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ आवडतो आणि तो 'चेन्नई सुपर किंग्ज'चा कट्टर चाहता आहे.

आता लग्नानंतर अनिरुद्ध आपली पसंती बदलून पत्नीच्या म्हणजेच हैदराबाद संघाला पाठिंबा देणार का, असा गमतीशीर प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या