वैभव सूर्यवंशीचा दिल्ली विमानतळावर संताप; ‘रिल्सच्या नादात…’ म्हणत पापाराझींना सुनावले

भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दिल्ली विमानतळावर तो पापाराझींवर संतापल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

mahasatta

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दिल्ली विमानतळावर तो पापाराझींवर संतापल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केलेल्या कॅमेरामनना त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांपासून सावध राहण्याचा सक्त सल्ला दिला. "तुम्ही रील्सच्या नादात कोणीतरी तुम्हाला ठोकेल," अशा शब्दांत वैभवने त्यांना सुनावले.

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासोबत वैभव नवी दिल्लीत दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदकविजेत्या खेळाडूंसाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यासाठी विमानतळावर पोहोचल्यावर पापाराझींनी त्याला गराडा घातला होता, तेव्हा हा प्रसंग घडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकवीरांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, "या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अनेक भारतीय खेळाडू १५-१७ वर्षांचे होते. इतक्या लहान वयात या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला गौरव मिळवून दिला. त्यांनी देशवासियांची मने जिंकली. यावरून हे दिसून येते की यशासाठी वयाची मर्यादा नसते. लहान वयात खेळाला सुरुवात करणे हा एक अतिरिक्त फायदा आहे." पंतप्रधानांचे हे शब्द ऐकून वैभव सूर्यवंशीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. पाकिस्तानला अंतिम सामन्यात हरवणे ही भारतीय चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरली. पुरुष संघासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघानेही या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या सत्कार समारंभाला इतर स्पर्धकही उपस्थित होते, ज्यांची पंतप्रधान मोदींनी भेट घेत त्यांच्यासोबत फोटोशूट केले आणि सर्वांचे कौतुक केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MahaSatta News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या